दागिने पॉलिश करून देतो सांगणाऱ्या संशयीताना ग्रामस्थांनी दिला चोप

0
324
बातम्या शेअर करा



गुहागर- सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगणाऱ्या दोघांना तळवलीतील सुज्ञ ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन गुहागर पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे महिलावर्गाची होणारी फसवणूक टळली असून बोगस संशयिताना पकडण्यात यश आले आहे. गुहागर तालुक्यातील तळवली येथे दुपारी दोन युवक दाखल झाले. तांबे पितळची भांडी व बांगडया साफ करणारे असे सांगून फसवणूक करण्याचा त्यांचा डाव हाणून पडला.


यावेळी एका महिलेच्या घरी ते गेले असता पॉलिश करणार आहोत, असे सांगून भांडी व बांगड्या द्या, असे सांगून सोन्याच्या काही वस्तू आहेत का? विचारू लागले सदर महिलेने काही नाही सांगून त्यांना जाण्यास सांगितले तरीदेखील ते आग्रह करत होते. शेवटी त्या महिलेस संशय आल्याने तिने काही ग्रामस्थांना सदर प्रकार सांगितला. त्यावेळी येथील सुज्ञ ग्रामस्थांनी त्यांना पकडले व विचारणा केली असता सदर व्यक्ती बिहार येथून नुकतेच चिपळूणला आले व तेथून तळवली येथे आले. सोबत आधारकार्ड सुद्धा बोगस असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांना गाठून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता ते पळत सुटले, त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना पकडून चोप दिला आणि सदरची घटना गुहागर पोलीस यांना सांगतल्यावर सदर ठिकाणी दाखल होऊन संशयित युकांना ताब्यात घेतले पुढील तपास गुहागर पोलीस करत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here