वाई; पोस्टमार्टेम रूमची झाली कचराकुंडी…

0
175
बातम्या शेअर करा

वाई – (प्रवीण घाडे)- सातारा जिल्ह्यातील वाई ग्रामीण रुग्णालयाला पोस्टमार्टम रुम नसल्याने अखेर वाई नगरपरिषदेने एमआयडीसी येथे पोस्टमार्टम रूम बांधून दिली. मात्र या पोस्टमार्टम रूम चा उपयोग सध्या कचराकुंडीत झाल्याने वाई येथील जनतेमधून नाराज यांनी संताप व्यक्त केला जात आहे.

वाई ग्रामीण रुग्णालयाकडे या रूमचा ताबा असून सदर रूमचा वापर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी करतात .त्या रुमची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी ग्रामीण रुग्णालयाची असून त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत .तिथे येणारे मृतदेह व नातेवाईक यांना त्यामुळे अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे .रुग्णालयाने तातडीने सदर रुमची स्वच्छता करावी व पोस्टमार्टम रूमचे झालेले कचराकुंडीचे स्वरूप बदलावे.
अशी अपेक्षा पोस्टमार्टम ला येणारे नातेवाईक करत आहेत .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here