गुहागर – दाभोळ खाडीत मोठ्या प्रमाणात कांदळवन वृक्षतोड होत असल्याची बातमी प्रगती टाइम्स मध्ये येताच आज गुहागर महसूल कार्यालय वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दाभोळ खाडीतील गुहागरच्या साईड पट्ट्यात पाहणी केली.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2022/02/IMG-20220209-WA0115-1024x683.jpg)
दाभोळ खाडी ही रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांना जोडणाऱ्या भागातून जाते. या खाडीमध्ये गुहागर तालुक्यातील काही भाग चिपळूण तालुक्यातील काही भाग खेड तालुक्यातील काही भाग आणि दापोली तालुक्यातील काही भाग या खाडीला जोडणारा आहे.
प्रगती टाइम्सच्या बातमीनंतर आज गुहागर महसूल विभागाच्या सहयोगाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परचुरी, वडद, पेवे ,कारूळ या भागात पाहणी केली यावेळी गुहागर तालुक्यातील या भागात कोणतीही तोड होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र असे असले तरी खाडीच्या समोरील भागात कांदळवन वृक्षतोड झालेली दिसत होती. जे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.ते व्हिडीओ दापोली तालुक्यातील असल्याचे ते व्हिडिओ मधून समजते तरी संबंधित अधिकारी वर्गाने दापोली तालुक्यात होणारी ही कांदळवन वृक्षतोड त्वरित थांबवावी अशी मागणी वृक्ष प्रेमी मधून केली जात आहे.