बातम्या शेअर करा

चिपळूण – जिल्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे.आज आलेल्या 40 पॉझिटिव्ह रुग्णासह आता जिल्यात 750 रुग्ण संख्या झाली आहे.तर रत्नागिरी जिल्ह्यात आजवर ४९४ जणांनी कोरोनावर मत केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या 57 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात १७ गावांमध्ये, दापोलीमध्ये ९ गावांमध्ये, खेडमध्ये ३ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ६, चिपळूण तालुक्यात १७ गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात १ आणि राजापूर तालुक्यात ४ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १० हजार ८४३ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी १० हजार ६०२ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ७५० अहवाल पॉजिटीव्ह आले असून ९ हजार ८१७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून २४१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. २४१ रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here