चिपळूण – चिपळूण तालुक्यातील एम थ्री पेपर कंपनीला परराज्यातून कामगार चांगलेच भोवले आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांविरुद्ध अखेर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्यातील स्थानिकांना प्राधान्य न देता खेर्डी येथील थ्री एम पेपरमिलचे व्यवस्थापक हसमुख शाह यांनी परप्रांतीय कामगारांना लॉक डाऊन कालावधीत कंपनीत कामाला आणले .उत्तरप्रदेश येथून ४७ कामगार घेऊन एक बस खेर्डी येथे दाखल झाली. हे सर्व कामगार येथील थ्री एम पेपर मिल कंपनीत पॅकिंग करण्यासाठी आणले होते. यामुळे सोमवारी खेर्डीत वातावरण चांगलेच तापले होते. यामध्ये राजकीय पक्षांसह स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
अखेरीस थ्री एम पेपर मिल कामगार प्रकरणी अखेर प्रशासनाने कारवाई केली आहे. त्यामध्ये साथरोग प्रतिबंधक नियमांचा भंग केल्याप्रकरणी थ्री एम पेपर मिल चे व्यवस्थापक हसमुख शहा, ठेकेदार रवी यादव आणि बस चालक राजू गुप्ता या तिघांवर शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.