रत्नागिरीत तरुण वकिलाची आत्महत्या

0
388
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. अमेय सावंत असे या वकिलाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

अमेय अजित सावंत (34) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री त्यांनी परटवणे येथील राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला गळफास बांधून आत्महत्या केली. मध्यरात्री उशिरा ही बाब लक्षात आल्यानंतर शहर पोलिसांना याची खबर देण्यात आली. अमेय सावंत हे बार असोसिएशनचे सदस्य होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक वकिलांनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार त्यांच्या गावी मिऱ्या येथे होणार आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here