चिपळूण – स्थानिकांना प्राधान्य न देता युपीच्या कामगाकरांना कंपनीत कामाला आणणाऱ्या खेर्डी येथील पेपरमिलच्या व्यवस्थापकाला खेर्डीतील युवा पिढीने धारेवर धरताच त्याची चांगलीच बोबडी वळली तसेच एका तासात त्यांना खेर्डीतुन बाहेर न काढल्यास कंपनीच बंद करण्याचा इशारा देताच हसमुख भाईची तारांबळ उडाली सदरचा प्रकारचा खेर्डी येथील थ्री एम पेपर मिलमध्ये घडला आहे.
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील थ्री एम पेपर मिलमध्ये मध्यप्रदेशहुन 47 कामगाराची बस खेर्डीत येताच काही सामाजिक कार्यकर्ते यांनी ही बस कुंभार्ली घाटमार्ग खेर्डीत आलीच कशी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून प्रशासन याला जाब विचारला. यावेळी त्याच्याकडे आर टी ओ चा पास असल्यामुळे बंस कुंभार्ली घाटमाथ्यावरून खेर्डीत येऊ शकली अशी माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांनी आपला मोर्चा पेपरमील कंपनीकडे नेला यावेळी कंपनीचे व्यवस्थापक हसमुख भाई यांनी त्याचे स्वागत केले पण मीडियाचा कमेरा सुरू ठेवलात तर मी बोलणार नाही असे थेट उत्तर दिले त्यामुळे कॅमेरा बंद करण्यात आला आणि इन कॅमेरा चर्चा सुरू झाली
यावेळी ह्या कामगारांना कंपनीत आणले कोणी यावर एका उत्तरप्रदेश माणसाचे नाव पुढे आले आणि त्याला बोलावून जाब विचारण्यात आला यावेळी रवी नामक कामगाराने सांगितले की पॅकिंग करण्यासाठी ही माणसे युपी वरून आणली आहेत. मग मात्र सामाजिक कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी हसमुख भाईला चागलेच धारेवर धरले स्थानिक माणसे असताना बाहेरून कर्मचारी का आणलेत आणि पॅकींगला कामगार पाहिजे होते ते आम्हाला सांगायचे होते ते आम्ही दिले असते. त्यामुळे येथील स्थानिक युवकांना रोजगार मिळाला असता. ते काही असो आता एका तासात या कामगारांना खेर्डीतुन हलवायचे नाहीतर कंपनी बंद करण्याचा इशारा देताच हसमुख भाईची बोबडी वळली आणि एकच तारांबळ उडाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना आणि ब्रेक द चेन नावाची संकल्पना राबविण्यात यावी या उद्देशाने जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसाचे लॉकडाऊन सूरु असताना कंपनीने आशा प्रकारे परराज्यातील कामगार खेर्डीत आणणे योग्य आहे का? असाच सवाल उपस्थित होत आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य अबु ठसाळे, ग्रामपंचायत सदस्य दशरथ दाभोळकर,युवासेना तालुका प्रमुख उमेश खताते, ग्रामपंचायत गट नेते विश्वनाथ फाळके,विराज खताते,गणेश भुरण,बाळा दाभोळकर,मुराद चौगुले,सलमान चौगुले,अखिलेश खेडेकर,आदि खेर्डीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2017/06/newspaper-rec728.jpg)