बातम्या शेअर करा

चिपळूण – एका लहानगीचा मृतदेह दवाखान्यात केवळ बिल रक्कम संपूर्ण भरली नाही म्हणून थांबवून ठेवला होता….ही बाब त्या मुलीच्या वडिलांच्या मित्राला समजताच त्याने आमदार भास्कर जाधव यांना थेट फोन केला….जाधव साहेबांनी दोन मिनिटं वेळ दे एवढच सांगितलं…..आणि दुसऱ्या मिनिटाला त्या लहान मुलीचा मृतदेह तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आला……आणि त्या आईला गहिवरून आले……

केवळ पैशाच्या अडचणीमुळे आपल्या लहान मुलीचा मृतदेह ताटकळत राहिलेला असताना त्या माऊलीच्या हृदयाला काय वेदना झाल्या असतील…..पण केवळ निवडणुकी पुरतेच आपली सजगता न दाखविणारे भास्करशेठ यांनी चुटकीसरशी समस्या सोडवून आपली कार्यतत्परता पुन्हा दाखवून दिली.
खेर्डी नजिकच्या गावातील एक लहान मुलगी दुर्दर आजाराने त्रस्त त्यामुळे जास्त आजारी झाल्याने तिला शहरातील एका खाजगी दवाखान्यात न्हेण्यात आले.तिथून तिला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.आधीच पतीने अवेळी सोडलेली साथ त्यात हा दुःखाचा डोंगर एकीकडे याच वेळी आमदार भास्कर जाधव यांनी दाखवलेली तत्परता सगळीकडे कौतुकाचा विषय ठरत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here