गुहागर – गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील नवतरुण युवकांसाठी शुंगारतळी येथे पार पडलेल्या गुहागर प्रीमियमलीग या क्रिकेट स्पर्धेनंतर आता अंडर आर्म ही स्पर्धा लवकरच होणार आहे. ही स्पर्धा ही ग्रामीण भागातील खेळाडूंनसाठी सुवर्णसंधी ठरले. या स्पर्धेसाठी तालुक्यातील खेडोपाड्यातील खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत.
गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय आहे. गावागावात ,वाडी-वाड्यात जवळपास ऑक्टोबर पासून संपूर्ण मे महिन्यापर्यंत अनेक प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. त्यासाठी गावातले स्थानिक तरुण, मुंबईचे तरुण असे एकत्र येऊन गावातील तरुणांमध्ये एकोपा निर्माण व्हावा खेळाची जिद्द निर्माण व्हावी आणि त्याच खेळाच्या बळावर त्यांनी भविष्यात आपला खेळ दाखवा व या उत्साहाने अनेक ठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात. मात्र या सर्व प्रकारात तालुक्यातील नवतरुण खेळाडू एकत्र यावेत आणि या मधून एखादा खेळाडु हा जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर खेळता यावा यासाठी गुहागर तालुक्यातील आदर्श युवामंच यांनी या वर्षीपासून गुहागर प्रीमियमलीग स्पर्धा भरवण्याचा निर्णय घेतला.
मे महिन्यात शृंगारतळी येथील भव्यदिव्य अशा मैदानावर स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये जवळपास सोळा संघ सहभागी झाले होते. आता त्या स्पर्धेच्या यश नंतर गिमवी येथे 24 संघांच्या सहभागाने अंडर-आर्म स्पर्धा होणार आहेत. या होणाऱ्या स्पर्धेसाठी सध्या खेळाडूंची नोंदणी सुरु असून आपण संयोजकांची संपर्क साधावा असे आव्हान करण्यात येत आहे.
या स्पर्धेत प्रत्येक संघ हा साखळी पद्धतीने खेळला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक संघाला जवळपास एक ठराविक रक्कम खर्च करण्याची मुभा आयोजकांनी दिली आहे. आणि टीम तयार करून मालकांनी खेळाडू लिलाव पद्धतीने खरेदी करायचे आहेत. यावेळी गुहागर तालुक्यातील सर्वच भागातून गावा-गावातून खेळाडूंना फॉर्म भरून सहभागी करण्यात येतील . आणि त्याच जमलेल्या खेळाडू मधून उत्तम खेळणारे 24 कप्तान तयार करण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी तालुक्यातून अनेक नामवंत खेळाडू आणि ग्रामीण भागातील खेळाडू येणार असल्याने या स्पर्धेमध्ये कोण विजयी होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गुहागर प्रीमियमलीग ही नुसती स्पर्धा नसून या स्पर्धेतून जे खेळाडू तालुकास्तरावर आपलं नेतृत्व आपली क्षमता सिद्ध करतील या खेळाडूंना भविष्यात जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर कसा खेळता येईल यासाठी सुद्धा आयोजक संधी उपलब्ध करून देणाऱ आहेत. त्यामुळे खरोखरच गुहागर प्रीमियमलीग ही ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे. हे मात्र तेवढेच खरे