दापोली – कोकणात रत्नागिरी जिह्यात दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे यांनी चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले.
रविवारी दुपारी ३ वाजता सुटणारी दापोली-ठाणे या शिवशाही बसवर ड्युटीसाठी बांगड्या भरून हजर झाले व प्रवासी शिवशाही प्रवासी बस घेऊन ते ठाण्याकडे रवाना झाले आहेत. हे चालक मुळचे बीड येथील असून कुटूंब नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे. शासकीय सेवेत विलनीकरण करा अशी या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू आहे तुर्तास कोकणात एसटी सेवा सुरळीत आहे मात्र आता दापोली एसटी अगरातही कर्मचारी आंदोलनाची ठिणगी पडली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दापोली एसटी डेपोतील चालक अशोक वनवे यांनी सांगितले की,आपल्या पत्नीने कामावर जाऊ नका, गेलात तर हातात बांगड्या भरून जा असे सांगितले कामावर न आल्यास मेमो मिळेल ही भिती होती.आमचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यामुळे यंदा आमच्या कुटुंबाने दिवाळी साजरी केली नाही अवघ्या १३हजार रुपये पगारात घर कसे चालवायचे हा प्रश्न आमच्या समोर आहे असे आंदोलनकर्ते वनवे यांनी सांगितले.कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यामुळे यातून तात्काळ चांगला निर्णय घ्यावा अशी मागणी वनवे यांनी केली. आमच्या मागण्याना आता आश्वासन नकोत तर आमचे दुःख समजुन घेऊन सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा अशी प्रतिक्रिया त्यानी पटत्रकरांजवळ बोलताना व्यक्त केली.