गुहागर – गुहागर तालुक्यातील वेळंब येथे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभागाने रात्री अटक केली. येथील न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यावर एकाच दिवशी दोन ठिकाणी कारवाई करण्याचा प्रकार घडला.
संगमेश्वर तालुक्यातील शिंदे आंबेरी (ता. संगमेश्वर) येथे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभागाने सापळा रचून अटक केली. त्यानंतर गुहागर तालु्क्यातील वेळंब येथे दुसरी कारवाई वन विभागाकडून करण्यात आली. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 2 किलो 150 ग्राम उलटी जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.
चिपळूण तालुक्यातील शिंदे आंबेरी येथे
प्रसाद प्रविण मयेकर , नरेंद्र वसंत खाडे, सत्यभामा राजू पवार, अजय राजेंद्र काणेकर, वय ३६ , रा. असगोली ता. गुहागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्याकडून ६.२ किलो व्हेल माशाची उलटी, चारचाकी वाहन जप्त
करण्यात आले. ही कारवाई सुरू असतानाच गुहागर तालुक्यातील वेळंब येथे व्हेल माशाच्या उलटीची तस्करी सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. विभागीय वनाधिकारी दिपक खाडे, जिल्हा पोलिस धिक्षक मोहितकुमार गर्ग, उपविभागीय वनाधिकारी सचिन निलख, परिक्षेत्र वनाधिकारी राजेश्री कीर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळंब येथे रात्री 8 वाजता कारवाई केली. या प्रकऱणी तौफिक याकूब अलवारे, (वय. 38, परचुरी, गुहागर) अब्दुल मजिद इस्माईल तांबे (वय. 56, रा. मिरजोळी चिपळूण), चंद्रकांत शंकर कातळकर (वय. 51. वेळंब) यांना अटक करण्यात आली आहे.