गुहागर – गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे रानटी डुकरांचे सुळ (दात )विकण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना पकडण्यात गुहागर पोलिसांना यश आलंय गेल्या आठ दिवसात गुहागर तालुक्यात तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली ही दुसरी घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी दोन इसम रानटी डुकराचे सुळ (दात )विकायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणी तालुक्यातील साखरीआगार येथील प्रणव गडदे, दिलीप बिर्जे या दोन
जणांना डुकरांच्या सुळ (दात)सह रंगेहात पकडण्यात यश आले त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे डुकरांच्या सुळांच्या तीन जोड्या मिळून आल्या बाजारात या सगळ्याची किंमत लाखो रुपयांमध्ये मोडते ही कारवाई पोलीस निरीक्षक बीके जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी पोलीस जीडी कादवडकर ,वैभव चौगुले ,प्रथमेश कदम,व्हीव्ही वायंगणकर , एस एस नाटेकर आदींसह वनविभागाचे अधिकारी संतोष परशेट्ये व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने तालुक्यात खळबळ माजली असून या परिसरात अशा प्रकारे कोण तस्करी करण्यासाठी येणार असेल तर त्याची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.