गुहागर – गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील सर्व्हे नं. २१४ सर्व अनधिकृत बांधकामे विनाविलंब हटविणेत यावीत, अशी नोटीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सहाय्यक बंदर निरिक्षक यांनी सुमारे २० व्यावसायिकांना दिली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या व्यावसायिकांच्या दुकानांवर आता शासन बुलडोझर फिरविण्याची तयारी करत आहे असेच म्हणावे लागेल.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, पालशेत कार्यक्षेत्राच्या मौजे गुहागर येथील सर्व्हे नं. २१४ मधील बंदर विभागाचे नावे असलेल्या जागेमध्ये केलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे. सदरची अतिक्रमणे हे या कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता उभी केलेली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी यापूर्वी सुचना दिल्या होत्या. परंतु अद्यापही आपण अतिक्रमणे काढलेली नाहीत. सदर अतिक्रमणे उभारण्यासाठी आपण मेरीटाई बोर्डाची परवानगी घेतेली नाही. तरी हे पत्र मिळालेपासून पाच दिवसांच्या आत आपण अनधिकृतपणे उभारलेली दुकाने हटवून त्याखालील जागा त्वरीत रिकामी करुन द्यावी. अन्यथा अतिक्रमण हटाव योजने अंतर्गत ही अतिक्रमणे दूर करणेत येतील. त्यासाठीच्या खर्चाची वसूली आपलेकडून करणेत येईल. होणाऱ्या नुकसानीला आपण जबाबदार असाल, अशा नोटीसा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे सहाय्यक बंदर निरीक्षक, पालशेत यांनी पाठविल्या आहेत.