बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी येथील कारकरवाडी मध्ये एक किराणा मालाचे दुकान फोडून जवळपास तीस हजार रुपयांची चोरी झाली होती या चोरीप्रकरणी दोन संशयीत चोरांना गुहागर पोलीसांनी 2 तासात तपास करत अटक केल्याने गुहागर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

झोंबडी गावातील कारकरवाडी येथे अनंत लांजेकर यांचे किराणा मालाचे दुकान आहे. आनंद लांजेकर आज सकाळी नेहमीप्रमाणे आपलं दुकान उघडण्यास गेले असता त्यांना दुकानाचे कुलूप उघडे असल्याचे आढळून आले व इतरत्र सामान विखुरलेले दिसले त्याच वेळी त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून आपल्या दुकानात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलीस निरीक्षक बीके जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि आपल्या पथकासह अवघ्या दोन तासात दोन संशयित चोरांना पकडण्यात यश आले हे दोन्ही संशयित चोर झोंबडी गावातीलच असून गावात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांची ही धडक कामगिरी पार पाडण्यासाठी गुहागर पोलिस स्टेशनचे राजू कांबळे, वैभव चौगुले, प्रितेश रहाटे आदींनी सहकार्य केले पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या चोरीचा अधिक तपास पोलीस कर्मचारी हनुमंत नलावडे करत आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here