चिपळूण – महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी (ता. 2) येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात (लोटिस्मा) महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार शेखर निकम आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी आमदार शेखर निकम, प्रशांत यादव यांच्यासह लोटिस्मा
चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, ज्येष्ठ मूर्तिकार दिवंगत रघुवीर कापडी यांचे नातू सुरेश कापडी, शिल्पकार संदीप ताम्हणकर व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी आमदार श्री. निकम यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि श्री. यादव यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी . निकम म्हणाले, की महात्मा गांधी हे स्वातंत्र्यासाठी खऱ्या अर्थाने धडपडणारे होते. त्याग करण्याची त्यांची वृत्ती आपण अंगिकारली पाहिजे. महात्मा गांधींचे कार्य लोकांसमोर यायला हवे. लोभ आणि लाभापासून दूर राहून आपण कार्य करायला हवे. गांधींचा आदर्श, साधेपणा, सर्वस्व सोडून देण्याची मानसिकता शिकण्याची गरज आहे. त्यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून हा बोध आपण घेऊया. लोटिस्मा
ने ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गारही या वेळी निकम यांनी काढले.
श्री. प्रशांत यादव म्हणाले, म्हणाले, की महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त एक चांगले काम आपल्या हातून घडत आहे, हे आपले भाग्य आहे. गेल्या 14 वर्षांपासून महात्मा गांधींच्या पुतळ्याची कमतरता भासत होती. आज या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यामुळे लोटिस्मा
च्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे. सध्याची देशभरातील परिस्थिती पाहता महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि सहिष्णूतेची आज गरज आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे. लोकांना त्यासाठी प्रेरित करण्याची काम करायला हवे.
महात्मा गांधींच्या पुतळ्यासाठी सहकार्य केल्याबद्दल या वेळी लोटिस्मा
च्या वतीने प्रशांत यादव यांचा आणि सुरेश कापडी व शिल्पकार संदीप ताम्हणकर यांचा डॉ. यतीन जाधव यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांची मूर्ती व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेवक कबीर काद्री, लोटिस्मा
चे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गुलजार कुरवले, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले यांच्यासह अनेक वाचक, लोटिस्मा
चे पदाधिकारी आदी उपस्थित होते. पत्रकार धीरज वाटेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लोटिस्मा
च्या संचालिका मनिषा दामले यांनी सर्वांचे आभार मानले.