कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात आयशर ट्रक दरीत कोसळला; चालकाचा मृत्यू

0
169
बातम्या शेअर करा


चिपळूण – चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात एक आयशर ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सलमान शेख असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
सलमान हा आपल्या ताब्यातील आयशर ट्रक लोटे नेरोलॉक कंपनीतून औरंगाबाद येथे कलरचे डबे घेऊन निघाला होता. कुंभार्ली घाटात आला असता या ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कठडा तोडून सुमारे २०० फूट दरीत ट्रक कोसळण्याची घटना घडली. हा अपघात सकाळी चेकपोस्टच्या ड्युटीवर जाणाऱ्या पोलीस कर्मचारी सुशांत जाधव यांच्या लक्षात आला. यानंतर याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांना दिली. यानंतर पाटील यांच्यासह गणेश शिंदे, जवरत, दीपक ओतारी आदी पोलीस कर्मचारी पोफळी व्यायाम शाळा मित्र मंडळच्या कार्यकर्त्याना घेऊन दरीत उतरले आणि डोळीच्या साह्याने सन्मान शेख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदरच्या अपघाताची नोंद अलोरे पोलीस स्थानकात करण्यात आली असून अपघाताचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. अधिक तपास अलोरे-शिरगाव पोलीस करीत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here