मंडणगड – मंडणगड तालुक्यातील पेवे उंबरशेत खलाटी येथे मंडणगड पोलीसांना 9 गावठी ब़ॉम्ब सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गावठी बॉम्ब सापडण्याची मंडणगड तालुक्यातील ही पहीलीच वेळ असल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीसांना मिळालेल्या माहिती नंतर पेवे उंबरशेत खलाटी या ठिकाणी पोलीस पथकाने सापळा रचून केलेल्या धडक कारवाईत तीन संशयीतांसह 9 गावठी बॉम्ब हा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. या संदर्भात पुढील तपासास बाधा येऊ नये याकरिता अधिक माहीती पोलीसांकडून मिळालेली नाही. पोलीसांकडून या विषयासंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून अधिक तपास युध्द पातळीवर सुरु आहे. पोलीसांनी केलेल्या कारवाईत पोलीस निरिक्षक शैलजा सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गफार सय्यद, पोलीस कॉ़न्स्टेबल वैभव गमरे, पोलीस कॉन्स्टेबल ऋुषीकेश देसाई यांनी सहभाग घेतला.