गुहागर ; पडवे गावात तीन म्हैशी गेल्या वाहून..

0
1042
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील पडवे गावात पुराच्या पाण्यात तीन म्हैशी गेल्या वाहून तर दोन म्हैशी गंभीर अवस्थेत वाचवण्यात यश आले असुन एक म्हैस मृत्युमुखी पडली आहे.

गुहागर तालुक्यातील पडवे गावातील वसंत राऊत यांच्या मालकीच्या चार म्हैशी आज सकाळी चारण्यासाठी काताळे नवानगर परिसरात गेल्या असताना परतीच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने या दोन गावा दरम्यान असणाऱ्या डावाचा प-या या ओढ्याला मोठा पूर आल्याने राऊत यांच्या तीन म्हैशी व एक रेडकू या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. यापैकी दोन म्हैशी व रेडकाला वाचवण्यात राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले मात्र एक म्हैस या ओढ्यातून वाहून जाऊन जयगड खाडी मध्ये गेली मात्र ही म्हैस मृत पावली होती.या घटनेची गंभीर दखल घेत ग्रामसेवक व तलाठी यांनी तात्काळ परिस्थितीची पाहणी करुन पंचनामा ही केला. राऊत यांच्या म्हशी जाफराबादी जातीच्या असल्याने मृत म्हैशीची अंदाजे किंमत एक लाख रुपये व गंभीर जखमी झालेल्या दोन म्हैशींच्या उपचारासाठी पंचवीस- पंचवीस हजार रुपये असा एकूण दीड लाख रुपये नुकसान
भरपाईचा पंचनामा करण्यात आला आहे. वसंत राऊत हे गेली अनेक वर्ष पडवे गावात दूध व्यवसाय करत आहेत. परिस्थिती बेताची असल्याने पोस्टमन म्हणून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपला दूध व्यवसाय चालू ठेवला आहे. मात्र आज घडलेल्या प्रकारामुळे राऊत यांच्या वरती मोठा आघात झाला आहे तरी शासन स्तरावरून त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा पडवे काताळे परिसरातून व्यक्त होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here