गुहागर – गुहागर -चिपळूण मार्गावरील मोडकाआगार येथील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला झाला मात्र याच पुला शेजारील असणारा जुना पूल पाडण्यासाठी 15 जून ते 30 जून पर्यंत या मोडकाआगार पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे असे ठेकेदार शिवाजी माने यांनी सांगितले.
त्यामुळे दिलेला शब्दही जरी पाळला असला तरी रस्ता मात्र अजूनही वाहतुकीसाठी 30 जून पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांमध्ये व्यक्त होत आहे.