सरपंच-उपसरपंच, सदस्य व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून विमा संरक्षण मिळावे- प्रशांत यादव

0
68
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींना विलगीकरण कक्ष उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कार्यवाहिला सुरुवात झाली आहे. या कक्षाच्या नियोजनासह कोरोना बाधितांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्नशील राहणार आहेत. यामुळे या सर्वांना कोविडच्या अनुषंगाने फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी काँग्रेसचे चिपळूणचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here