पुणे- राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेतून जवळपास ६ हजार गाड्या बाद होणार आहेत. एसटी प्रशासन भाडेतत्त्वावर ५०० गाड्या घेणार असले तरी ही संख्याही तोकडी पडणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार गाड्या आहेत. यातून रोज जवळपास ६० लाख प्रवाशांची वाहतूक होते. आयुर्मान संपल्याने ३ हजार गाड्याथेट रिटायर कराव्या लागणार आहेत, तर २ हजार गाड्या मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणार आहेत. एक हजार गाड्या तांत्रिक कारणासाठी डेपो व कार्यशाळेत असतात. या गाड्या सेवेत नसतील तर रोज १० ते १५ लाख प्रवाशांची गैरसोय होणार आहे.