मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल गळतीमुळे वाहतूक विस्कळीत

0
317
बातम्या शेअर करा

खेड- – मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात झाला
खेडमधील भोस्ते घाटात हा अपघात झाला आहे. केमिकलच्या टँकरला पाठीमागून कंटेनरची जोरदार धडक झाली आहे. टँकरमधून केमिकलची गळती झाली आहे. गळती झाल्यामुळे केमिकल महामार्गावर पसरले आहे. क्रिष्टल एसपी नावाचं केमिकल असल्याची पोलिसांची माहिती दिली आहे.

गेल्या एक तासापासून महामार्ग ठप्प असून दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाली आहे. केमिकल महामार्गावर पसरल्याने सहा ते सात दुचाकी घसरल्या आहेत. सायंकाळी 5: 30 वाजता झाला अपघात झाला असून अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आता दोन तासांच्या अथक प्रयत्न नंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. खेड मधील मदत ग्रुपच्या सदस्यांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत केली


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here