गुहागर -गुहागर तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक एकनाथ पाटील आज आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले
गुहागर तालुक्यातील एकनाथ तुकाराम पाटील 1984 झाली कोळवली येथे ग्रामसेवक या पदावर रुजू झाले त्यानंतर ते 96 97 या कालावधीत गिमवी-देवघर या ग्रामपंचायतीवर कार्यरत होते. 1998 साली चिखली येथील ग्रामपंचायतीवर कार्यरत असताना त्यांच्या अथक प्रयत्नाने त्यावेळी या ग्रामपंचायतीला जिल्ह्यातील मानाचा असा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार प्राप्त झाला. आज ते आपल्या 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शीर या ग्रामपंचायतीत सेवानिवृत्त झाले. त्यांनी ग्रामसेवक पदावर केलेले कार्य हे नक्कीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे.