“अँटीकरप्शनच्या ‘ नावे तोतयागिरी करणाऱ्या तिघांना गुहागर मध्ये अटक

0
1319
बातम्या शेअर करा

गुहागर -(तेजस आंबेकर ) – तुमचं दुकान अनाधिकृतपणे चालू आहे. तुमच्या दुकानात दारू विकली जाते तुम्हाला शासनाचे आदेश असताना सुद्धा तुम्ही दुकान उघडे का ठेवले असे सांगून गुहागर तालुक्यात तोतयागिरी करत दुकानदारांना लुटल्या प्रकरणी नॅशनल अँटिकरप्शन कमिटीच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सह तिघांना अटक केल्याने गुहागर तालुक्याचा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली.

गुहागर तालुक्यातील खाडीपट्टी भागातील वेळणेश्वर ,अडूर ,बोऱ्या भागात गेल्या दोन दिवसापासून आम्ही अँटी करप्शन ऑफिस कडून आलो आहोत तुमच्या बाबत काही अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या जर मिटवायच्या असतील तर आम्हाला पैसे द्या असे सांगत अनेकांकडून पाच ते दहा हजार रुपये घेत या टोळक्याने अनेकांना गंडवले असल्याच्या तक्रारी काल दिवसभरात गुहागर पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्या आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तपास करत या तोतयागिरी करणाऱ्या पथकातील तिघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी अँटिकरप्शन च्या नावाने तोतयागिरी करणारे हे तिघेजण चिपळूण तालुक्यातील रहिवाशी असून त्यांनी अशाच प्रकारे अनेक ठिकाणी लुटल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम करत आहे हे तिघे जण चिपळूण तालुक्यातील कापसाळ संजय वाजे, अमित महाडिक आणि पेढे परशुराम येथील तुषार तावडे हे तिघे जण असून या तीन जणांनी अजून कुठं काय केलं आहे.? का याचा तपास गुहागर पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाई ने गुहागर तालुक्यातून अनेक नागरिक पोलिसांचे अभिनंदन करत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here