रत्नागिरी – पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अखेर अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार पुत्राला पकडण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा सुरु होती.
Home ताज्या बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अखेर रत्नागिरी मधून अटक