आबलोली ; नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

0
929
बातम्या शेअर करा

गुहागर- गुहागर तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठ मध्ये शासनाचे नियम पायदळी तुडवत अत्यावश्यक सेवा वगळून सुरु असलेल्या एकूण 11 दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहे. व त्यांच्यावर गुहागर पोलीस ठाणे येथे भा.द.वि.स.क. 188,269,270, भारतीय साथरोग अधिनियम 1897 चे कलम 3 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ही कारवाई गुहागरचे निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी पोलीस नाईक शिवलकर ,पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, साळसकर व नारकर उपस्थित होते. तरी नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियम आणि अटी पाळून प्रशासनाला मदत करावी अशी सूचना गुहागर पोलिस आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा लॉकडाऊन संपेपर्यंत अशीच कारवाई केली जाणार असल्याची माहिती गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here