खेड; शिवजयंती उत्साहात साजरी ; रसाळगडावरही शिवजयंती उत्साहात

0
125
बातम्या शेअर करा

खेड – खेड तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयन्ती निमिताने ठिकठिकाणी शिव मिरवणुकीची आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू शिव मिरवणुका काढण्यात आल्या.
शिवजयंतीनिमित्त भरणे नाक येथील अश्वारूढ पुतळ्यापासून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. जय शिवाजी, जय भवानी या गगनभेदी घोषणांनी आसमंत निनादून गेला. दुचाकी रॅलीत सहभागी झालेले शिवप्रेमी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दुचाकी हाकत होते त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावर कुठेही रहदारीचा प्रश्न निर्माण झाला नाही. भरणे नाका येथील शिवपुतळ्याला वंदन करून निघालेली मिरवणूक खेड शहरात दाखल झाली तेव्हा शिवप्रेमींचा उत्साह कमालीचा होता. मिरवणुकीदरम्यान खेड पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता.
सालाबादप्रमाणे रसाळगडावरील झोलाई मातेच्या मंदिरात गिरिभ्रमण मंडळ खेड आणि रसाळगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने शिजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गेली ३२ वर्ष गिरिभ्रम मंडळ खेड यांच्या वतीने रसाळगडावर शिवजयंती साजरी केली जाते. यावर्षी देखील ही परंपरा कायम राखण्यात आली. यावेळी खेड तालुक्यातील अनेक शिवप्रेमी झोलाई मंदिरात उपस्थित होते.
खेड तालुक्यातील शिवफाटा येथेही शिवजयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी रायगडावरून आलेल्या शिवज्योतीचे पूजन करून शिवजयंती उत्सवाला सुरवात करण्यात आली. शिवजयंती निमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
खेड तालुक्यातील शिवफाटा येथेही शिवजयंती निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी रायगडावरून आलेल्या शिवज्योतीचे पूजन करून शिवजयंती उत्सवाला सुरवात करण्यात आली. शिवजयंती निमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here