गुहागर – गुहागर तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशी बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी मध्ये सध्या गुहागर -विजापूर या रस्ता रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र असं असतानाही ज्या शृंगारतळी मध्ये सुरुवातीला चारपदरी रस्ता होता त्याठिकाणी या सिमेंट रस्ता रुंदीकरणामुळे दुपदरी रस्ता राहणार असल्याने व्यापारी वर्ग आणि स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गुहागर- विजापूर हा रस्ता रुंदीकरण गेली दोन वर्षांपासून सुरू आहे. बाजारपेठेत सुरुवातीला हा रस्ता जवळपास 40 मीटर रस्ता रुंदीकरण होता. त्यावेळेला रस्त्याच्या मधोमध दुभाजक होता. आणि दोन्ही साईडला वाहतूक पार्किंग करून वाहन जाण्यासाठी रस्ता राहत होता. मात्र यावेळी रस्ता रुंदीकरणासाठी नवीन सिमेंट कॉंक्रीट रस्ता केला जातोय त्याने या रस्त्याची रुंदी कमी होणार असून भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. येथील मुख्य गटारेजी सुरुवातीला ज्या ठिकाणी होती या ठिकाणी न राहता त्या गटारांची दिशा आणि मार्ग बदलून रस्त्याच्या मार्ग बदलल्याने गटाराच्या कडेला असलेल्या दुकानात मध्ये पुन्हा अनधिकृत बांधकाम करण्यास जोर मिळणार आहे. त्यामुळे व्यापारीवर्ग संतप्त आणि नाराज झाला असून आमचा जुना रस्ता होता तेवढाच रस्ता आम्हाला रस्ता रुंदीकरण करून मिळावा अशी मागणी आता व्यापारी व ग्रामस्थ करत आहेत.
गुहागर तालुक्यातील महत्वपूर्ण शुंगारतळीची बाजारपेठ आहे या बाजारपेठेत त्यावेळेला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुशील वेल्हाळ यांनी प्रशासनाची झगडत प्रशासनाशी लढा देत शृंगारतळी बाजारपेठेत दुभाजक टाकून रस्ता रुंदीकरण करून घेतला होत जेणेकरून दोन्ही साईडला वाहन पार्किंग करून वाहतूक सुरू राहील. मात्र सद्यस्थितीत जे रस्ता रुंदीकरण होतं हे तो रस्ता रुंदीकरणात रस्त्याच्या बाजूला किंवा दुकानाच्या समोर कोणतीही पार्किंग करता येणार नाहीये आणि जर पार्किंग केली तर या वेळेला वाहन चालक यांमधून वादावादी होऊन भविष्यात वाहतूक जाम किंवा वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. तरी या ठिकाणी असणारे लोकसेवक ,लोकप्रतिनिधी ,पुढारी, आमदार ,खासदार यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन हा रस्ता रुंदीकरण सुरुवातीला जेवढा होता तेवढाच ठेवावा अशी मागणी आता जोर धरत आहे.