पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे उद्घाटन

0
370
बातम्या शेअर करा

गुहागर : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाई प्रतिष्ठान व यशस्वी ॲकडमी फॉर स्कील यांच्या संयुक्त विद्यमाने रामपूर येथील मिलिंद विद्यालयाच्या पटांगणात सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना नेते, पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ॲड.अनिल परब, नोकरी महोत्सवांचे आयोजन करणारे आमदार भास्कर जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, आमदार शेखर निकम, योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने,शिक्षण सभापती सुनील मोरे, माजी सभापती अरूण कदम, चारूता कामतेकर, ऋतुजा खांडेकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, जि.प.सदस्य विक्रांत जाधव, अरविंद चव्हाण, नेत्रा ठाकूर, पूनम चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण उपस्थित होते. मंत्री आदित्य ठाकरे यांचे आमदार भास्कर जाधव आणि जि.प.सदस्य विक्रांत जाधव यानी शाल, पुष्पगुच्छ आणि पुष्पहाराने त्यांचे स्वागत केले. सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवात दहा हजाराहून अधिक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. सकाळी नऊ वाजल्यापासून मिलिंद हायस्कूलच्या मैदानावर उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here