चिपळूण ; स्वप्ना यादव यांना सहकार सेवेतील आदर्श नवदुर्गा पुरस्कार जाहीर

0
201
बातम्या शेअर करा

चिपळूण – अवघ्या महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात अव्वल कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना प्रशांत यादव यांना सहकार सेवेतील आदर्श नवदुर्गा पुरस्काराने जागतिक महिला दिनी गौरविण्यात येणार आहे.
८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनतर्फे विशेष समारंभमध्ये कवी केशवसुत स्मारक , मालगुंड गणपतीपुळे, येथे महिला दिनाच्या येथे पूर्वसंध्येला ०७ मार्च २०२१ रोजी एका कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार आहे..

महाराष्ट्र राज्यभरातील ५० शाखेव्दारे कार्यरत असणाऱ्या सहकारातील आदर्श चिपळूण नागरी पतसंस्थेचे यशस्वी व्यवस्थापन-नियोजन संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्ना यादव ह्या गेले अनेक वर्ष करत आहेत.सहकारातील बारकावे अवगत करून ह्या क्षेत्रातील उच्चतम यश स्वप्ना यादव यांनी मिळविले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here