गुहागर काँग्रेस तालुकाध्यक्षपदी रियाज ठाकूर यांची निवड

0
360
बातम्या शेअर करा

गुहागर – नुकतेच महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले यांची वर्णी लागल्यानंतर आता जलदगतीने कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेसने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. सर्वांच्या परिचित असणारे व सर्वांच्या सुखदुखात सहभागी होणारे शृंगारतळी येथील रियाज ठाकूर यांची गुहागर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी नव्या तालुकाध्यक्षांच्या हाती सुपूर्द केले.

रियाज ठाकूर हे युवानेते असून त्यांचा चांगल्या प्रकारे जनसंपर्क आहे. कोरोना काळातही गरिब गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. गुहागर तालुक्याच्या राजधानीत त्यांचे वास्तव्य असल्याने जनतेच्य समस्या ते सोडवण्याचे प्रयत्न करू शकतात. अनेक युवा कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे काँग्रेस वाढविण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. ग्रामपंचायत पाटपन्हाळेचे ते विद्यमान सदस्य आहेत. वरिष्ठ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे ते गुहागर तालुक्यासाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करू शकतात. त्यांच्या निवडीमुळे गुहागर तालुक्यातूनच नव्हे तर जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here