चिपळूण – शाळेची वार्षिक फी भरली गेली नाही म्हणून परीक्षेला बसू न देण्याचा प्रकार चिपळूण तालुक्यात घडला असून झालेल्या प्रकाराबद्दल सर्वत्र नाराजीने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील खतीजा इंग्लिश मिडियम स्कुल या शाळेमध्ये आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाला फी न भरल्यामुळे परीक्षेला बसू देण्यात आले नाही त्याला पेपर चालू असताना वर्गाच्या बाहेर काढण्यात आले. गोवळकोट येतील मैनुदीन अ. रज्जाक सय्यद यांचा मुलगा टिपुसुलतान मैनुदीन सय्यद हा खतीजा इंग्लिश मिडियम स्कुल या शाळेमध्ये शिकत आहे. त्याच्या शाळेची वर्षाची फी भरली नाही म्हणून त्याला आज पेपरला बसु दिले नाही व त्याला पेपर चालु असताना वर्गाच्या बाहेर काढण्यात आले. अशी तक्रार चिपळूण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
या आधी कोरोनाच्या काळात मैनुदीन सय्यद यांच्यावर काळाने घाला त्यांच्या मुलीचा न्यूमोनियाने मृत्यू झाला तीचे वय ९ वर्षे होते तिच्या त्या आजारात तिच्यावर अतोनात खर्च झाला त्यामुळे मला मुलाची फि भरण्यास उशिर झालेला आहे ही समस्या त्यांनी शाळेच्या पदाधिकार्यांना सांगितली परंतु जोपर्यंत फि भरत नाही तोपर्यंत तुमच्या मुलाला शाळेत पाठवायचे नाही त्याला परिक्षेला बसून देणार नाही. असे शाळेने सांगितले
घडलेल्या प्रकाराने मुलाचे शैक्षणिक नुकसान होत असून मुलाच्या मनावर खुप वाईट परिणाम झाला आहे
तरी माझ्या मुलाचे काही बरे वाईट झाल्यास खतिजा इंग्लिश मिडियम हायस्कूल त्याला जबाबदार राहील. असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात सर्वत्र व्यवहार ठप्प होते त्यामुळे आर्थिक टंचाई होती. अशा वेळेला शाळेने तरी विद्यार्थ्यांना समजून घ्यावे अशी अपेक्षा पालक वर्ग करीत आहे. मात्र शाळा जर अशी उद्धट वर्तन करत असेल तर अशा या शाळेवर कारवाई करण्याची मागणी आता येथील नागरिक करीत आहेत. चिपळूण पोलिसांकडे आलेल्या तक्रारी नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क न झाल्याने अधिक माहिती घेता आली नाही.