ग्रामपंचायत निवडणुक प्रचारात रंग भरू लागला; यावेळी सोशल मिडियावरील हायटेक प्रचाराला प्राधान्य

0
133
बातम्या शेअर करा


खेड – ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरू लागला आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आता मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेताना दिसत आहे. मात्र तरीही यावेळी पहिल्यांदाच सोशल मिडियावरील हायटेक प्रचाराला प्राधान्य दिले जात असल्याने चित्र आहे.
खेड तालुक्यातील ८७ ग्रामपंचयतीच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पैकी २३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ६४ ग्रामपंचायतीसाठी ६८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २३ ते ३० डिसेंबर दरम्यान निवडणुक अधिकाऱ्यांकडे ११९० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्या पैकी ८ अर्ज छाननीदरम्यान बाद ठरल्याने ११८२ अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला १६७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात १०१५ उमेदवार राहिले. या पैकी ३३० उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता ६८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब अजमावत आहेत.
४ जानेवारी
रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुक उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आणि उमेदवार प्रचाराला लागले. या वेळी अनेक उमेदवारांनी अतिशय कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचता येणाऱ्या सोशल मिडिया या माध्यमाला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. अमुक पॅनेलच्या तमुक उमेदवाराला मत म्हणजे विकासाला मत अशी घोषवाक्य उमेदवाराच्या हात जोडलेल्या फोटोसह सोशल मिडियावर वायरल केली जात आहेत. काही उमेदवारांनी मात्र सोशल मिडियाला बाजूला ठेवून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेण्यावर भर दिला आहे.
शहरालगतच्या भडगाव आणि भरणे तसेच लोटे औद्योगिक वसाहतीतील आवाशी आणि लोटे या चार ग्रामपंचायती अतिशय संवेदनशिल ग्रामपंचायती मानल्या जात आहेत. भडगाव ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २५ तर भरणे ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी तब्बल ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आवाशी ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी १४ तर लोटे ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
१५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होत असल्याने जाहीर प्रचाराला केवळ चार दिवस उरले आहेत त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे समर्थक अन्य सारी कामे बाजूला ठेवून प्रचाराचा धुरळा उडवताना दिसत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here