परभणी – परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील मृत्यु पावलेल्या त्या ८०० कोंबड्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ मुळेच झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हा अहवाल भोपाळ येथील प्रयोग शाळेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे मुरुंबा गाव संसर्गित झाल्याचे जाहीर करून बर्ड फ्लू च्या अनुषंगाने उपाययोजना करण्याची कारवाई उद्यापासून करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.
परभणीतील मुरुंबा गावाच्या एक किलोमीटर परिसरातील कोंबड्या नष्ट करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.