बातम्या शेअर करा

रत्नागिरी — 15 जानेवारीला जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आता जिल्ह्यात 479 ग्रामपंचायतीमध्ये 360 ग्रामपंचायत मध्ये प्रत्यक्ष मतदान होणार असून 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
तर बिनविरोध उमेदवारांची संख्या 1814 आहे. आणि जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतीसाठी 4332 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे अशी आहे.
राजापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायती मध्ये 9 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 41ग्रामपंचायत मध्ये एकूण उमेदवार 559 त्यातील 136 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

दापोलीत तालुक्यातील 57 ग्रामपंचायत मधील 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.42 ग्रामपंचायत मधील 99 प्रभागासाठी 459 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या 130 प्रभागात 712 उमेदवार रिंगणात आहेत तर 180 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.तर 12 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

खेड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतीमध्ये 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून प्रत्यक्ष मतदान 64 ग्रामपंचायतीत होणार असून 685 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत. त्यातील 330 उमेदवार हे बिनविरोध झाले आहेत.

लांजा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीमध्ये 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 19 ग्रामपंचायती मध्ये 216 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात असून . तर 72 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

गुहागर तालुक्यातील मधील 29 ग्रामपंचायतीमध्ये 13 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 16 ग्रामपंचायत मध्ये 170 उमेदवार रिंगणात प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.तर 152 उमेदवार बिनविरोध झाली असून 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

मंडणगड तालुक्यात मध्ये 15 ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये एकूण 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाली असून 13 ग्रामपंचायती मध्ये 113 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत.

चिपळूण तालुक्यात -83 ग्रामपंचायती मध्ये 22ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 61 ग्रामपंचायती मध्ये निवडणूक होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यात 81 ग्रामपंचायती मधील 19ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 62 ग्रामपंचायती मध्ये निवडणूक होणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यात 1949 उमेदवार बिनविरोध झाले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here