गुहागर – गुहागर -विजापूर महामार्गावरील मोडकाघर धरणावरील पुलाचे काम सुरू झाल्याने गेले नऊ महिने सर्वच वाहनांना लांब पल्ल्याचा व पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत होता.मात्र आतायाच वाहनांची प्रवासाची समस्या दूर झाले असून आज सायंकाळपासून धरणांमध्ये टाकलेल्या मातीच्या भरावा वरून लहान वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे.
गुहागर- विजापूर महामार्गावरील मोडकाघर धरणावरील पूल धोकादायक झाल्याने गेली वर्षभर या पुलावरून एकेरी मार्गाने छोट्या वाहनांची वाहतूक सुरू होती यामध्येच काही महिने जड वाहनांचीही वाहतूक सुरू झाली होती दरम्यान एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपासून महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदार यांनी धरणावरील पुलाचे काम सुरू केल्याने येथील वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. गुहागर वासियान बरोबर सर्व तालुका वासियांना पालपेणे, पवार साखरी, रानवी मार्गे गुहागरला यावे लागत होते एसटी वाहतूकही याच मार्गाने सुरू आहे.
गुहागर ते शृंगारतळी दहा किलोमीटरचा रस्ता ते वीस किलोमीटर पर्यंत लांब पल्ल्याचा बनला आहे. ठेकेदाराने अन्य कोणताही पर्यायी मार्ग तयार केलेला नाही. अशा वेळेला वरवेली येथील ग्रामस्थांनी स्वखर्चाने तयार केलेल्या रस्त्यावरून लहान वाहने जाण्याची व्यवस्था केल्याने यामार्गे वाहतूक सुरू झाली होती. धरणावरील पुलाचे काम करण्याकरता ठेकेदाराला पुलाच्या बाजूने मातीचा रॅम्प तयार करावा लागला आहे. या रॅम्पवरून छोटी वाहाने जाण्याची सुविधा ठेकेदार जानेवारीच्या सुरुवातीला देणार होता त्याप्रमाणे आज सायंकाळपासून या ठिकाणाहून लहान वाहनांची वाहतूक सुरु झाली आहे. या पुलाशेजारी टू व्हीलर व लहान फोर व्हीलर या रस्त्याने जाऊ शकतात अशा पद्धतीचा बोर्ड ठेकेदाराने लावला आहे. यामुळे काही प्रमाणात गुहागर तालुका वासियांना दिलासा मिळणार आहे.