गिमवी ; रुद्र अ‍ॅकॅडमी व टीडब्ल्यूजे ग्रुप आयोजित रांगोळी स्पर्धा संपन्न

0
519
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील गिमवी येथील स्वांतत्र्यसैनिक कै. महादेव सिताराम जाधव व पार्वती जाधव उद्यानात सुभाष जाधव यांच्या पुढाकाराने गेल्या ४ महिन्यांपासून मोफत कवायत, पोलीस, आर्मी या सारखे प्रशिक्षण शिबिर सुरु आहे. तसेच नुकतेच समीर सुभाष नार्वेकर व लतीश साळगांवकर यांच्या संकल्पनेतून रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यांच्या या उपक्रमांचे गिमवी पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधिकारी सुभाष जाधव यांनी शासकीय नोकरीत सेवा बजावत असताना आपल्या कार्यकतृत्वाची छाप पाडली आहे. इतकेच नव्हे तर अवैध धंदेवाल्यांमध्ये जरब बसवून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करण्यात आपले योगदान दिले आहे. त्यांनी रुद्र अ‍ॅकॅडमी व टीडब्ल्यूजे ग्रुप यांच्या सहकार्याने गिमवी पंचक्रोशीतील सुशिक्षित तरुणांना शासकीय नोकरीत विशेषत: पोलीस, आर्मीमध्ये संधी मिळावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून येथे प्रशिक्षण शिबीर सुरु आहे. या शिबिरात गिमवी गावासह पंचक्रोशीतील ३० मुले प्रशिक्षण घेत आहेत. या शिबिराच्या माध्यमातून आपले ध्येय गाठण्यासाठी प मेहनत घेताना दिसत आहे. या शिबिराला ग्रामस्थ उपस्थिती लावत असल्याने तरुणांना प्रेरणा मिळत आहे.

या शिबिराबरोबरच रांगोळी स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा टीडब्ल्यूजे संस्थापक अध्यक्ष समीर नार्वेकर व रूद्र ॲकॅडमीचे प्रमुख ललित साळगांवकर यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेत पहिल्या गटात (इयत्ता १ ली ४ थी) प्रथम प्रेम राणे, द्वितीय क्रमांक यश रामाणे, तृतीय क्रमांक ओम जाधव, दुस्ºया गटात (इयत्ता ५ वी ते ७ वी) प्रथम संचित रामाणे, तिसºया गटात (८ वी ते १० वी) प्रथम वेदांत बारे, द्वितीय अथर्व पाटील, तृतीय क्रमांक नूतन रामाणे, चौथ्या गटात प्रथम सानिका शितप, द्वितीय समीक्षा रामाणे, खुल्या गटात प्रथम मेघना घाडगे, द्वितीय क्रमांक सुजाता बाईत तर तृतीय योगेश सोमण तर उत्तेजनार्थ राहूल रामाणे, प्रशांत मोरे, पायल घाडगे, स्वरा जाधव, जान्हवी जाधव, शर्वरी जाधव, अंकिता साळगांकर यांनी यश संपादन केले आहे. टीडब्लजे ग्रुप आयोजित आरोग्य शिबिरावेळी या स्पर्धेतील यशस्वी रांगोळीकरांना सन्मानित केले जाणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here