गुहागर – ईगल फाऊंडेशनच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय गरुड झेप 2020 या पुरस्काराचे वितरण श्री श्रेत्र गणपतीपुळे येथे रविवारी उत्साहात पार पडले. दै. तरुण भारतचे पत्रकार प्रशांत चव्हाण व उद्योजक निलेश चव्हाण यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन येवला (जि. नाशिक) चे आमदार नरेंद्र दराडे यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात कोरोना कालावधीत उल्लेखनीय कामाबद्दल तसेच अन्य क्षेत्रातील कामाची दखल घेऊन काही निवडक व्यक्तींना गौरविण्यात आले. उद्योजक निलेश चव्हाण यांच्यावतीने त्यांचे बंधू सतीश चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून येवल्याचे आमदार नरेंद्र दराडे. सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा नलावडे, ज्येष्ठ विधीज्ञ राजशेखर मलुष्टे, नाशिकचे पत्रकार श्रीकांत सोनावणे, सचिन बैरागी, किरण काळे, आटपाडी पंचायत समिती सभापती सौ. भूमिका बेरगळ, माजी सैनिक खंडू दूधभाते, वैभव पाटील, ईगल फाऊंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव शेखर सूर्यवंशी, प्रकाश वंजोळे, दीपक पोतदार, सौ. शालन कोळेकर, उद्योजक सतीश चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले. प्रास्ताविक विलासराव कोळेकर यांनी केले. आभार प्रकाश वंजोळे यांनी मानले.