काळसूर -कौंढर येथे गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त ..

0
719
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील काळसूर -कौंढर या ठिकाणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी टाकलेल्या धाडीत गावठी हातभट्टीची दारु व भट्टी असे मिळून एकूण एक लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष रामाणे यांच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळसूर -कौंढर या ठिकाणी
टाकलेल्या धाडीत जंगलातील गावठी दारूची हातभट्टी व दारू असा एकूण एक लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी गुहागर पोलीस अधिक तपास करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here