गुहागर ; बोऱ्या व नरवण येथे देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व गावठी हातभट्टीची दारु जप्त

0
539
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील बोऱ्या व नरवण भंडारवाडा या दोन ठिकाणी गुहागर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत विनापरवाना देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व गावठी हातभट्टीची दारु असा एकूण १३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी सुप्रिया संदेश ठाकूर व नितेश दिनेश आरेकर यांच्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारावाडा येथील नितेश आरेकर याच्या घरी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गोवा बनावटीच्या व्हिस्कीच्या ७५० मिली मापाच्या १० प्लास्टिकच्या बाटल्या, ७० लिटर दारूने भरलेले ३५ लिटर मापाचे दोन प्लास्टिक कॅन असा एकूण ४ हजार ४०0 रुपयांचा मुद्देमाल सापडून आला. तसेच बोऱ्या येथील सुप्रिया संदेश ठाकूर यांच्या घरावर सायंकाळी टाकलेल्या छाप्यात विनापरवाना देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व गावठी हातभट्टीची दारू असा एकूण ८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. या प्रकरणी गुहागर पोलीस अधिक तपास करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here