चिपळूण – मागील आठवड्यांपूर्वी 200 किलोमीटरची BRM स्पर्धा पूर्ण केल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी चिपळूण सायकलिंग क्लब च्या विक्रांत आलेकर यांनी 300 किलोमीटरच्या स्पर्धेचे अंतर 14.40 तासात पूर्ण करून पुन्हा एकदा आपल्या सायकलिंगची चमक दाखवून चिपळूण शहराचे नाव पुन्हा रोशन केले आहे.
ही स्पर्धा पुणे-कराड-पुणे यां मार्गांवर घेण्यात आली होती ज्यामध्ये 300 किलोमीटर साठी त्यांना 20 तासाचा कालावधी दिला गेला होता यामध्ये 28 सायकलिस्ट शामिल झाले होते. या सर्वांच्यात चिपळूणकडून विक्रांत सुनील आलेकर यांचा सहभाग होता. सदर स्पर्धेत विक्रांत यांचे मोठे बंधू
अमर आलेकर यांनी देखील 200 किलोमीटरच्या गटातील स्पर्धेत सहभाग नोंदवून दिलेले 200 किलोमीटरचे अंतर 10.35 तासात पूर्ण केले. यामध्ये 16 सायकलिस्ट सहभागी होते व दिलेले अंतर 13.5 तासात पूर्ण करायचा कालावधी त्यांच्याकडे होता. सायकलिंग क्षेत्रातला मानाचा समजला जाणारा
SR (Super Randonneur) हा किताब मिळवण्यापासून हे युवक आता फक्त दोनच पाऊले दूर आहेत. ज्यासाठी त्यांना 400 आणि 600 किलोमीटर चे अंतर येणाऱ्या काळात Audax ने आयोजित केलेल्या स्पर्धेत पूर्ण करावे लागेल ज्यासाठी हे नित्यनियमाने सराव देखील करत आहेत. आलेकर बंधूंच्या या कौतुकास्पद कामगिरीसाठी व पुढील वाटचालीसाठी आपल्या समस्त चिपळूणवासियांकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

