शृंगारतळी ; कै.विष्णूपंत पवार यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

0
224
बातम्या शेअर करा

शृंगारतळी -गुहागर तालुक्यातील नामवंत ठेकेदार, दानशूर व्यक्तीमत्व कै.विष्णूपंत पवार यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त मंगळवार 24 नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत पवार कुटुंबियांतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कै.विष्णूपंत पवार हे गुहागर तालुक्यातील नामवंत ठेकेदार होते. सामाजिक कार्यामध्ये त्यानी तालुक्यात बहुमुल्य योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे कर्तृत्वान मुलगे भरत, दिपक, डॉ.राजेंद्र, शेखर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक योगदान देत आहेत. गेली नऊ वर्ष विष्णुपंत म्हणजेच भाऊंच्या स्मृतीदिनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून २४ नोव्हेंबर रोजी शृंगारतळी येथील विष्णुपंत पवार मेमोरिअल हॉस्पिटल या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांपैकी तीन भाग्यवान रक्तदात्यांस लकी ड्रॉ पध्दतीने ड्रॉ पाडून रोख रक्कम रूपये ३ हजार देण्यात येणार आहेत. तरी सामाजिक भावनेतून संपन्न होणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ.राजेंद्र पवार यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here