मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे कामात मोठा घोळ; कार्यालयात साप सोडण्याचा संदीप सावंत यांचा इशारा

0
276
बातम्या शेअर करा

चिपळूण -मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण परशुराम ते आरवली या रस्त्यावरील खड्डे भरणे ही चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीचीच जबाबदारी आहे.पण त्यासाठी नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे.त्याची मुदत देखील संपली.तरी देखील अधिकारी दिशाभूल करत आहेत.सुमारे ४ कोटी ८९ लाखाचे हे काम झालेच नाही.त्यामुळे संबंधित ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करून चेतक आणि ईगल या मुख्य ठेकेदार कंपनीकडून खड्डे भरून घ्यावेत.अन्यथा कार्यालयात साप आणून सोडेन.मग पळता भुई करून सोडेन असा इशारा तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी दिला आहे.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत महामार्ग खड्डे भरणे कामाचा जणू पर्दाफाश केला.रस्त्याची दुरुस्ती डागडुजी हे चौपदरीकरण करणाऱ्या मूळ ठेकेदार कंपनीची आहे.त्यांनी त्यासाठी प्रथम परशुराम आरवली हायवेज आणि ब्ल्यूम क.प्रा.लिमिटेड यांना खड्डे भरण्याचे काम दिल्याचे सांगितले.त्यांनी काम केले नाही म्हणून त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता काळ्या यादीत न टाकता थेट ओम मनीषा कन्स्ट्रक्शन यांना काम देण्यात आले.४ कोटी ८९ लाख या कामासाठी मंजूर करण्यात आले.८ मे रोजी कामाचे आदेश देण्यात आले आणि ४ नोव्हेंबर २०२० ला काम पूर्ण करायचे होते.अशी माहिती संदीप सावंत यांनी देऊन नवा घोळ समोर आणला आहे.
दिलेल्या मुदतीत मनीषा कन्स्ट्रक्शन ने काम केलेच नाही.आणि आता प्रशासन अधिकारी सांगताहेत हे काम मनीषा कन्स्ट्रक्शन ला दिलेले आहे.काम तर झालेच नाही.मुदत ही संपली.मग ते ४ कोटी ८९ लाख कुठे गेले ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.अधिकारी फक्त दिशाभूल करत आहेत.मोठा घोळ या कामात झाला आहे.जी कंपनी कराड चिपळूण रस्त्याचे काम वेळेवर करत नाही.अनेक नोटीसा पाठवून ठेकेदार दाद देत नाही.त्यांच्याकडून मुंबई गोवा मार्गावरील खड्डे भरून घेण्याची प्रतीक्षा का केली जात आहे.त्याचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा आणि मूळ ठेकेदार कंपनी असलेल्या चेतक आणि ईगल या कंपनीकडूनच तात्काळ खड्डे भरून घेण्यात यावेत अन्यथा सर्पमित्रांना बरोबर घेऊन कार्यालयात चक्क साप आणून सोडेन.त्यावेळी मात्र पळता भुई करून सोडेन असा गर्भित इशारा संदीप सावंत यांनी देऊन महामार्ग प्रशासन आणि ठेकेदार कंपनीची पुन्हा एकदा कोंडी केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here