दापोली – ऐन दिवाळी सणाच्या दिवशी दापोली तालुक्यातील हर्णे- पाळंदे येथे दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे त्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
आज सकाळी दिवाळीच्या निमित्ताने महाड येथील नवानगर सुतारआळी येथून ८ जण पर्यटक फिरायला आले होते. हे आठही जण तसे तरुण आणि कॉलेजमध्ये शिकणारे होते. हे आले ते पाळंदे समुद्र किनारी उतरली. अमावस्या असल्यामुळे समुद्राला भरती होती.
मुलांना पाहण्याचा मोह आवरला नाही. आठजणापैकी दोघेजण किनाऱ्यावर थांबले आणि उर्वरित सहाजण पोहायला गेले. पाळंदे समुद्रकिनारा तसा धोकादायक नाही परंतु समोरच एक खड्डा असल्यामुळे हे सहाही जण त्याच खड्ड्यात पोहत होते त्यामळे जोराची लाट आली आणि सहाजण बुडाले त्यावेळी किनाऱ्यावर उभे असलेल्यांनी आरडाओरड केला. आरडाओरड पाहताच पाळंदे मधील ग्रामस्थ अक्षय टेमकर, निखिल बोरकर,प्रवीण तवसाळकर यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांना चौघांना वाचवण्यात यश आले.
याचवेळी पाळंदेमधील अभिजित भोंगले, अनिकेत बोरकर, सुदेश तवसाळकर, मीतेश मोरे, प्रीतम तवसाळकर, अनिल आरेकर, जहुर सुर्वे, राजेंद्र तवसाळकर, आदी ग्रामस्थांनी यावेळी धाव घेऊन मदतकार्य चालू केले. तीन बेपत्ता असणाऱ्या पर्यटकांचा शोध सुरू केला आणि त्यावेळी एक पर्यटक सापडला पण अजूनही अजून दोन पर्यटक बेपत्ताच आहे. तपासकार्य चालू आहे.