शिरगाव ( ता चिपळूण ) : शिरगावचे सुपुत्र व दैनिक सागरचे प्रतिनिधी श्री निसार महंमद शेख याची छत्रपती युवा सेनेच्या रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले
छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अद्यक्ष गणेश कदम यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हाप्रमुख रियाज ठाकूर यांनी पत्रकार निसार शेख यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती केली गेल्या दोन वर्षांपासून निसार शेख छत्रपती संघटनेवर काम करण्याचे स्वप्न पाहत होते आणि दिवाळीच्या दिनीच रियाज ठाकूर यानी त्यांची निवड करून त्यांना दीपावलीची आगळी वेगळी भेट दिली
त्यांच्या निवडीचे वृत्त समजताच अनेकांनी प्रत्यक्ष, दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .