खेड ; वेगमर्यादेबाबत कोणतीही सुचना न देता दंड आकारला जात असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी

0
230
बातम्या शेअर करा

खेड – मुंबई गोवा महामार्गावर निश्चित करण्यात आलेल्या वेग मर्यादेबाबत कोणतीहीम पुर्व सुचना देताच वाहन चालकांकडून वेग मर्यादा ओलांडल्याबद्दल दंड वसूल करण्यात येत असल्याने विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे काम पुर्णत्वास जाण्याआधीच वाहन चालकांकडून वेग मर्यादेबाबत दंड वसूल करणे हा वाहन चालकांवर अन्याय नव्हे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेले चार वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. खेड तालुक्याच्या हद्दीत येणारा कशेडी ते पशुराम या ४४ किलोमिटरच्या चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीकडून सुरु आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील फक्त खेड तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गाचे सुमारे ७० टक्के काम पुर्ण झाले आहे. अन्यत्र मात्र हा मार्ग अद्याप खड्ड्यातच गेलेला आहे. या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी आणि चालक यांना आदळत आपटत प्रवास करावा लागतो आहे. मात्र जेव्हा हे चालक आपले वाहन घेऊन खेड तालुक्याच्या हद्दीत येतात तेव्हा खड्डेमुक्त रस्ता पाहून आपसुकच वाहनांचा वेग वाढलेला असतो.
गेले काही दिवस कशेडी ते पशुराम या दरम्यान असलेल्या लवेल आणि भोस्ते घाटमाथा येथे वाहतुक पोलिसांची व्हॅन उभी असते. या व्हॅनमध्ये बसवण्यात आलेली अद्यावत यंत्रणा लांबूनच वाहनाचा वेग नोंद करते आणि ज्या वाहनाचा वेग ८० पेक्षा जास्त असेल त्या वाहनाच्या मालकाला एक हजार रुपयांची ऑनलाईन नोटीस पाठवण्यात येते. दंड न भरल्यास वाहनावर कारवाई करण्याचा इशाराही या
नोटीसीत देण्यात येतो.
महामार्गावर होणारे अपघात टळावे यासाठी वाहतुक विभागाने वेग मर्यादा निश्चित केली आहे हे स्वागतार्ह आहे. परंतू कोणत्या महामार्गावर किती वेग मर्यादा निश्चित केली आहे याची वाहन चालकांना आगावू सुचना मिळणे आवश्यक आहे. महामार्गावर निश्चित करण्यात आलेल्या वेग मर्यादेचे सुचना फलक जागोजागी लावण्यात आले तर वाहन चालक निश्चितच अलर्ट होतील आणि आपले वाहन निश्चित केलेल्या वेग मर्यादेच्या पुढे जाणार नाही याची खबरदारी घेतील.
महामार्गाचे काम पुर्णत्वास जायच्या आधी आणि वाहन चालकांना वेग मर्यादेबाबत कोणतीही पुर्वसुचना न देताच अद्यावत यंत्रणेचा उपयोग करून अशा प्रकारे दंड वसूल केला जात असेल तर तो चालकांवर अन्याय नव्हे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here