गुहागर – (विशेष प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेत नेमलेल्या बँकेच्या सोनाराने संगणमत करून बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संजय फुणगूसकर मिलिंद जाधव, मनोहर धूमे , गणेश कोळथरकर , सुलोचना पावसकर, शबीया परबुलकर ,विक्रांत दाभोळकर, राजेश भोसले, विनया दाभोळकर राहणार वेलदूर तालुका गुहागर अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदर्भ कोकण बँकेचे वेलदुर शाखेचे मॅनेजर मकरंद पत्की यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की आरोपी संजय फुणगुसकर याने सोन्याचे खोटे दागिने खरे दाखवून तसेच ते खरे असल्याचे खोटे मूल्यांकन केले यातील इतर आठ आरोपींची संगनमत करून हे खोटे दागिने खरे दागिने दाखवून बँकेकडे गहाण ठेवून वरील सर्व आरोपीने बँकेची १४लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाले व बँकेची फसवणूक झाली त्यामुळे या सर्व नऊ आरोपींविरुद्ध फसवणुकीची तक्रार गुहागर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे हा प्रकार गेल्या वर्षभरात घडला होता.















