दापोली -कोकणचे सुपूत्र रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक संदीप राजपुरे यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी अशी मागणी रत्नागिरी-रायगड जिल्ह्यातील कुणबी समाजाकडून करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकरराव कांगणे यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत केली.
कुणबी समाजोन्नती संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, आमचा बहुतांश समाज हा सेनेसोबत राहिला आहे. आमच्या प्रश्नांसाठी आमचा हक्काचा उमेदवार विधिमंडळात असायलाच हवा यासाठी आमचा संदीप राजपुरे यांच्या विधापरिषदेच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा आहे असे स्पष्ट मत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे निवत्त शिक्षण संचालक व श्यामराव पेजे स्मृती न्यासाचे पदाधि डॉ.जी.डी. जोशी यांनी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला दापोलीच्या नगराध्यक्ष परवीन शेख, माजी नगराध्यक्ष उल्का जाधव,खेडचे शिवसेना तालुका प्रमुख दत्ताराम गोठल,मंडणगड संतोष गोवले,खेड विभागप्रमुख विजय राक्षे,रघुनाथ पोस्टूरे,इरफान बुरोंडकर,राजेश भवणे, संजय शेंडगे,कुणबी समाज उपाध्यक्ष चंद्रकांत पड्याळ,दिनेश जावळे,संतोष आंबेकर, दिपक घडसे,मोहन शिगवण आदी उपस्थित होते. यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.