आबलोली -लोकशिक्षण मंडळ आबलोली आणि संस्थेच्या सर्व ज्ञानशाखांच्या वतीने कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी रक्तपेढीच्यावतीने रक्त संकलन करण्यात येणार आहे.
कोरोना आपत्तीच्या काळात सध्या मोठ्या प्रमाणात रक्त तुटवडा भासत आहे. याचा विचार करून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांना सौरकंदील भेट देण्यात येणार आहेत. या रक्तदान शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन लोक शिक्षण मंडळाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत यांनी केले आहे.
रक्तदान शिबिरात नाव नोंदणीसाठी सचिव राकेश साळवी (९४०५०७१५३१), संचालक अविनाश कदम (९४०५३२७५३८), मुख्याध्यापक डी.डी. गिरी (९४२०३७७८९०), मुख्याध्यापक नामदेव मेस्त्री (९४२००५४४०८) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.