आबलोली – कोरोना महामारीच्या काळात गुहागर तालुक्यातील तमाम विज ग्राहकांना महावितरण कंपनीकडून प्रचंड वाढीव विजबिले देण्यात आलेली आहेत हि वाढीव विजबिले कमी करून न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडले जाईल असा इशारा डोंबवली मुंबई येथील रहिवाशी गुहागर तालुक्यातील काताळे गावचे सुपूत्र व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क प्रमूख गणेश कदम यांनी दिला आहे .
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील महावितरण कार्यालयात हे निवेदन देण्यात आले या निवेदनात मनसेचे गुहागर तालुका संपर्क प्रमूख यांनी स्पष्ट नमूद केले आहे की , कोरोनाच्या महामारीत एकीकडे लॉकडाऊन मध्ये नोकरी धंदा ठप्प असताना दुसरीकडे महावितरण कंपनी कडून प्रचंड प्रमाणात आलेल्या वाढीव विजबिलांबाबत जनता , विजग्राहक त्रस्त आहेत तरी आपण सदरील विषयात गांभीर्याने लक्ष घालून वाढीव विजबिले कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अन्यथ: येणा-या काळात गुहागर तालुका मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा गणेश कदम यांनी निवेदनाव्दारे दिला आहे . या निवेदनाच्या प्रती मुख्य अभियंता , महावितरण अधिकारी कार्यालय गुहागर व चिपळूण कार्यालयात पाठवीण्यात आल्या आहेत
यावेळी गणेश कदम यांचे सोबत निवेदन देताना दिनेश निवाते , जयदिप कदम ,विलास खांबे , केतन पागडे ,विनायक रहाटे आदि कार्यकर्ते उपस्थित होते .